राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

rajya sabha-farmer-bill

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. राज्यसभा में आज विरोधी पक्षातील सदस्यांच्या गोंधळाचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. लोकसभेत मंजूर झालेली शेतकरी उत्पादन, व्यापार व वाणिज्य आणि शेतकरी (हक्क व सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयके केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी राज्यसभेत मांडली. तेव्हा सभागृहात जोरदार हंगामा झाला. सभापतींनी वेलमध्ये उतरून गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई केली आहे. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव, डोला सेन यांचा समावेश आहे.

काल झालेल्या घटनेवर बोलताना सभापती म्हणाले की, ‘राज्यसभेसाठी हा आजपर्यंतचा सर्वात खराब दिवस होता. काही खासदारांनी सभागृहात पेपर फेकले. माइक तोडला. रूल बुक फेकले. या घटनेमुळे मला अतिशय दु:ख झाले आहे. उपसभापतींना धमकावण्यात आले. त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका करण्यात आली.’ असे म्हणत सभापतींनी खासदारांच्या वर्तनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या