रामदेव बाबांच्या पतंजलीच्या विक्रीत 10 टक्क्यांनी घट

सामना प्रतिनिधी । मुंबई

उत्पादनाचा वेगाने विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे गुणवत्ता टिकवता न आल्यामुळे पतंजलीच्या उत्पादनांच्या विक्रीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी 2017 मध्ये असा अंदाज व्यक्त केला होता की, मार्च 2018 पर्यंत कंपनीची विक्री दुप्पट होऊन 20 हजार कोटींचा नफा होईल. पण पतंजलीच्या विक्रीत वाढ होण्याऐवजी 10 टक्के घट होऊन 8,100 कोटी रुपये झाली आहे. पतंजलीच्या वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. रॉयटर्सच्या सूत्र आणि विश्लेषकांनुसार, मागील आर्थिक वर्षी 2018-19 मध्ये पतंजलीच्या विक्रीत वाढ झाली असती, पण गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना हा फटका बसला.