पेण ते दिवा मेमू गाडीचे लोकार्पण, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पेण

पेण तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा अनेक वर्षांचा प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नाने अखेर रविवारी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सुटला. पेण ते दिवा मेमू गाडी क्रमांक 61016 ह्या रेल्वे गाडीचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या वेळी पेणच्या स्थानकावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जैन व पेण च्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेने तर्फे व मी पेणकर आम्ही पेणकर तर्फे पेढे साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, शहर प्रमुख ओकार दानवे, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, अवजड वाहतुक सेनेचे अच्युत पाटील, युवा सेनेचे आशिष वर्तक, प्रसाद देशमुख , ग्राहक संरक्षण कक्षाचे नंदु मोकल, नरेश सोनावणे, तुकाराम म्हात्रे, अशोक वर्तक , सुधीर धाणे, जयराज तांडेल, ऱाजा पाटील, जगदीश ठाकूर. ईश्वर शिंदे, कल्पेश बोरेकर, कांतीलाल म्हात्रे, लहू पाटील , जनार्दन कडु, श्रितेज पाटील, शैलेश पाटील, मयुर पाटील, विशाल दोशी, ” मी पेणकर आम्ही पेणकर” चे अध्यक्ष योगेश म्हात्रे, विजय पाटील, वैकुंठ पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे ,स्वप्नील पाटील, राजेश कांबळे, दिपक लोके, किरण बांदणकर , भाजपचे तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, विनित देव, वासुदेव पाटील, काँग्रेसचे अविनाश पाटील, नगरसेवक दर्शन बाफना, ललित पाटील आदींसह पेण शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

पेण ते पनवेल लोकल रेल्वे सेवा सुरू करावी. रोहा-पनवेल या मार्गावर शटल सेवा सुरु करावी, हॉलिड ट्रेनला पेण येथे थांबा मिळावा, लांबपल्ल्याच्या जलद गाड्यानां पेण रेल्वे स्थानकात थांबा देण्यांत यावा, प्रवाशानां पेण स्थानकात रिटर्न तिकिटाची सोय उपलब्ध व्हावी या मागण्यांसाठी शिवसेना व ” मी पेणकर आम्ही पेणकर ” शाश्वत विकास समन्वय समितीने, जेष्ठ नागरिक तसेच महिलांनी अनेक आंदोलने व उपोषण केले होते. या आंदोलनांची दखल केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली.

तसेच हा प्रश्न सोडवण्या करीता रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकारी वर्गाची मार्च महिन्यात “मी पेणकर आम्ही पेणकर” च्या शिष्टमंडळासह बैठक घेऊन पेण ते दिवा मेमो गाडी सुरू करण्या संदर्भात प्रयत्न केले होते. या प्रयत्नाना यश मिळाले व अखेर पेण ते दिवा मेमो गाडी आज रविवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी धावली.