पेण नगरपालिका करणार भटक्या श्वानांचा बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. यानंतर आता पेण नगरपालिकेने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले आहे. भटक्या श्वानांच्या निर्बीजिकरणासाठी खास बीड येथून पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

पेण शहरात भटक्या श्वानांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जून महिन्या पासुन नोव्हेंबर महिन्या पर्यंत सुमारे 65 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी बीड येथील डॉ. हनुमंत राव शेळके यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक भटक्या श्वानांना पकडून त्यांना भूल देऊन त्यांचे निर्बीजिकरण करणार आहेत. या पथकासाठी पेण शहरातील कुंभारआळी परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.