‘सॅलरी’ खात्यातच ‘पेन्शन ’

बचत खाते किंवा सॅलरी अकाउंट पेन्शन खात्यात रुपांतरित केल्यास एकापेक्षा जास्त खाती हाताळावी लागणार नाही.

निवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम दर महिन्याला नोकरदार व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा होते. निवृत्तीनंतर बहुतेकजण स्वतंत्र पेन्शन खाते उघडण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जातात. पण त्याऐवजी कर्मचाऱयांना आपले वेतन खाते (सॅलरी अकाउंट) पेन्शन खात्यात रुपांतरित करता येते. त्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तसेच केवळ पगार खातेच नाही तर बचत खाते देखील पेन्शन खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते.

त्यासाठी सर्वात आधी खातेधारकाने बँकेच्या मुख्य शाखेत विद्यमान सॅलरी खाते पेन्शन खात्यात रुपांतरित करण्यासाठी अर्ज करावा. यासोबतच पेन्शन पेमेंट ऑर्डरची (पीपीओ) प्रत सादर करावी लागेल. खातेधारकाने केवायसी पूर्ण करावी तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करावी.

पेन्शन खात्यासाठी दोन पासपोर्ट फोटो आणि पत्ता पुराव्याचे कागदपत्रे द्यावे लागेल. त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डच्या दोन प्रती जमा करा. जर खातेदाराचा ई-मेल आणि कायम वास्तव्याचा पत्ता जमा करणे आवश्यक असेल.