आंदोलनाची भीती, मोदींच्या सभेत काळे कपडेवाल्यांना नो एण्ट्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-london

सामना प्रतिनिधी । जयपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या आंदोलनाची भीती वाटते हे खरेच आहे. कारण येथील त्यांच्या सभेत काळे कपडेवाल्यांना नो एण्ट्रीच होती. एवढेच नव्हे तर काळय़ा रंगाची ओढणी, मोजे, रुमाल बाहेरच ठेवून जनतेला आत सोडले गेले.

मोदी आज काही विकासकामांच्या उद्घाटनासाठी जयपुरात आले होते. यावेळी त्यांची सभाही झाली. मात्र सभेसाठी आलेल्या लोकांना सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडवले. शर्ट, पॅण्ट किंवा बनियन यापैकी कोणताही कपडा काळय़ा रंगाचा असेल तर त्यांना माघारी पाठवले गेले. महिलांना काळी ओढणी, रुमाल काढायला लावले. त्यामुळे मेटल डिटेक्टरजवळ काळय़ा कपडय़ांचा ढीग तयार झाला होता. मोदींच्या कार्यक्रमावेळी कोणी आंदोलन किंवा निषेध करू नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली होती, असे सांगितले जाते.