
सामना ऑनलाईन । मुंबई
सरकार सातत्याने लोकांना गाजर दाखवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पेट्रोलच्या दरात काही प्रमाणात घट करून जनतेला दिलासा देणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा लोकांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. रविवारी पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढले. मुंबईत पेट्रोल 76.58 रुपये प्रति लिटर तर डिझेल 68.53 रुपये प्रति लिटर इतके होते.
दिल्लीत पेट्रोल 23 पैशांच्या वाढीसह 70.12 रुपये प्रति लिटर दराने तर डिझेल 29 पैशांच्या वाढीसह 65.45 रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने आणि रुपया घसरल्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत.




























































