Photo – सरकार बदलण्याचा लढा आता सुरू झाला पाहिजे, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दादर येथील शिवतीर्थावर आंदोलन केले. यावेळी जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली होती.