
टी-20 मालिकेत न्यूझीलंड क्रिकेट संघाचा 3-0 असा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाने आपले संपूर्ण लक्ष कसोटी मालिकेवर केंद्रित केले आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर येथे सुरू होणार आहे. दोन्ही संघ तयारीसाठी कानपूरला पोहोचले आहेत. कानपूरला पोहोचल्यावर दोन्ही संघांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही हिंदुस्थान-न्यूझीलंड क्रिकेट संघांचे भगव्या रंगाचा गमछा घालत स्वागत करण्यात आले.