
चंद्रपुरात उन्हाचा पारा 43 अंशांवर पोहचला आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. मनुष्यासह वन्य प्राण्यांनाही ऊन असह्य होत असल्याचं चित्र ताडोबातही पाहायला मिळालं आहे. डॉ. विवेक शिंदे या पर्यटकाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील कोलारा गेटमध्ये जंगलातील पाणवठ्यात पट्टेदार वाघ पाण्यात बसून आनंद घेत असल्याची छायाचित्रं कॅमेरात कैद केली. ही छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.