
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने निळ्या रंगाची नऊवारी नेसली असून त्यात ती फारच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. रुपालीचे हे फोटोशूट सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन मंत्री याने काढले आहेत.



























































