गावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद

453

जालना जिल्ह्यातील अवैध हत्यारे, शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते. अवैध शस्त्रास्त्र विक्री, खरेदी करणाऱ्या गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून काढण्याबाबत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले होते.

5 डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक यांच्या ओदशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी स्वतः लक्ष देऊन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना अवैध हत्यारे, शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी डी.बी. पथकाचे प्रमुख व कर्मचारी यांना आदेशीत करून सुचना दिल्याने डी.बी. पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे पथकासह शहरात अवैध धंदे करणारे इसमाचा व अवैध हत्यारे, शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढत असतांना पथकास खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गुत्तेदार अनिरुद्ध शेळके हा त्याच्या हंक मोटार सायकलवर बसुन जुना मोंढा येथे येत असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी, कर्मचारी हे जुना मोढा भागात सापळा लावून थांबले होते.

तेंव्हा एक संशयीत हिरो कंपनीची हंक मोटार सायकलवर येताच त्यास थांबविण्यासाठी हाताने इशारा केला असता तो पोलीसांना पाहून पळून जाऊ लागला असता त्यास कर्मचारी यांच्या मदतीने पाठलाग करून जागीच पकडले. त्यास त्याच्या ताब्यातून बनावटी लोखंडी पिस्टल मॅग्झीन सह 25 रुपये, मोटार सायकल 50 रुपये व अ‍ॅन्डरॉईलड मोबाईल 10 हजार रुपये किमतीचा असे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे संजय देशमुख, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, समाधान तेलंग्रे, संदीप बोंद्रे, साई पवार, सुधीर वाघमारे, सोपान क्षिरसागर, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, महिला कर्मचारी प्रियंका बोरकर यांनी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या