
पिझ्झा पार्टी, तीही अंतराळात… काय, विश्वास बसत नाही ना… पण सध्या अशाच अनोख्या पिझ्झा पार्टीची चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) गेलेले अंतराळवीर फ्लोटिंग पिझ्झा नाईटचा आनंद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ बघून लोक अचंबित झाले आहेत.
अंतराळवीर थॉमस पेस्केट याने पिझ्झा पार्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलंय, मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट. पृथ्वीवरचा शनिवारच जणू. एक चांगला शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाही, परंतु मी एक व्हिडीओ बनवला आहे.
अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे साध्या वाटणाऱया गोष्टी करणे कठीण असते, मात्र अंतराळ स्थानकात अंतराळवीरांनी चक्क पिझ्झा तयार करून खाल्ला. गुरुत्वाकर्षण नसल्याने पिझ्झा अंतराळात तरंगताना दिसत आहे.



























































