कॅनडामध्ये विमान दुर्घटना, दोन हिंदुस्थानी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये शनिवारी विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन हिंदुस्थानी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ब्रिटीश कोलंबियाच्या चिलीवॅकमध्ये घडली आहे.

कॅनडा पोलिसांना या घटनेची माहिती स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 च्या सुमारास मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विन-इंजिन लाइट एअरक्राफ्ट पाइपर पीए-34 चिलीवॅक शहराजवळील डोंगराळ भागात कोसळले. विमान टेक ऑफ करत असताना ते झाडाझुडपांवर आदळले आणि अपघात झाला.

अभय गडरु, यश विजय रामुगडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांची नावे असून ते मुंबईचे आहेत. कॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ते या घटनेचा तपास करण्यासाठी शोध पथक पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले की, सध्या या अपघातस्थळाचा तपास सुरु असून तिघांच्या मृत्यूव्यतिरिक्त कोणीही जखमी किंवा बेपत्ता असल्याची माहिती मिळालेली नाही.