‘प्लाझ्मा थेरपी’मुळे वाचले नवजात बाळाचे प्राण, जगातील पहिलीच घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत आहे. राज्यातील ‘मेडीकव्हर हॉस्पिटल’मधील तज्ज्ञ समुहाने प्लाझा थेरेपीद्वारे (ट्रान्सफ्यूशन) दोन महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाचे प्राण वाचवले आहेत. इतक्या कमी वयाच्या रुग्णात प्लाझ्माद्वारे प्राण वाचविण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.

हे नवजात बालक हॉस्पिटलला आले तेव्हा त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याच्या पुâप्पुâसात ८०टक्के कोरोना विषाणू संसर्ग होता. ज्यामुळे गंभीर न्युमोनियाचा सामना करावा लागला. श्वसनास अडथळा आणि उच्च रक्तदाबामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. रेमडेसीव्हर इजेक्शन ते हेपारीन उपचार, असे शक्य ते सर्व उपाय रुग्णावर व्यर्थ ठरले. याबाबत रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. सुशील पारेख म्हणाले , ‘हे बाळ उपचारांना कोणताही प्रतिसाद देत नव्हते. शेवटचा उपाय म्हणून आम्ही प्लाझ्मा चढविण्याचा निर्णय घेतला. आमच्या टीमने सुमारे २२ दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर ही बाल योद्धा पुन्हा तिच्या आईच्या कुशीत विसावली आहे. आता तिला घरी सोडले असून तिच्यावर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून देखरेख सुरू आहे.’