PM Modi : काही लोकांसाठी परिवारच पक्ष, प्रियांकांच्या नियुक्तीवर मोदींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-gandhi-pm-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करत काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला. आमच्यासाठी पक्षच परिवार असल्याचे मोदी म्हणाले.

Priyanka Gandhi : अखेर प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री, सरचिटणीसपदी नेमणूक

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रियांका यांच्या नावाचा उल्लेख न करता राजकारणातील घराणेशाहीवर हल्ला चढवला. ‘आमच्या पक्षामधील निर्णय एखाद्या परिवाराची किंवा व्यक्तीची काय इच्छा आहे यावरून होत नाही. परंतु देशात अनेक भागांमध्ये परिवारच पक्ष आहेत, परंतु भाजपसाठी पक्षच परिवार आहे’, असे मोदी यावेळी म्हणाले.

याआधी बुधवारी सकाळी गुलाम नबी आझाद यांच्याकडून सरचिटणीसपद काढू ते प्रियांका गांधी यांना देण्यात आले. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आझाद यांच्याकडे आता हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.