प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन; पद्मभूषणने केला होता सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. त्यांचा नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्या चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही.

वाणी जयराम यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी त्याचे निधन झाले आहे. त्यांनी पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीची नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली होती. त्यांनी 10 हजारपेक्षा जास्त गाणी गायिली आहेत. आर.डी. बर्मन, ओपी नय्यर, मदनमोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध गायकांसोबत काम केले आहे. त्यांनी अनेक सदाबहार चार्टबस्टर्स गाणी दिली आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात वाणी जयराम यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी आधुनिक हिंदुस्थानची मीरा म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी हिंदुस्थानी संगीताला वेगळ्याचा उंचीवर नेले होते. त्यांनी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी आणि ओरिया भाषेत गाणी गायिली आहेत. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओदिशा सरकारने राज्य पुरस्करानेही गौरवले आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.