जम्मू कश्मीरमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होणार ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

जम्मू- कश्मीरची विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरून विरोधक संतापले असून त्यांनी सरकारने खेळलेली ही एक खेळी असल्याचा आरोप केला आहे. इथे पीडीपी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्याकडे इथली सत्ता जाऊ नये यासाठी विधानसभा भंग केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील असे संकेत केंद्र सरकारकडून मिळाले आहेत.