मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोमवारी मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे 23 भाषांत पोस्टर लाँच करण्यात आले आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे तर ओमंग कुमार चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.