माघीनिमित्ताने आज श्री सिद्धिविनायकाची रथयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त 22 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी श्री सिद्धिविनायकाची रथयात्रा मंदिरातून दुपारी 3.30 वाजता निघणार आहे. या रथयात्रेचा मार्ग श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, एस. के. बोले मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, काशीनाथ घाणेकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी मंदिर, वीर सावरकर मार्ग आणि पुन्हा श्री सिद्धिविनायक मंदिर असा आहे. या रथयात्रेत हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

  • श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात 26 जानेवारी रोजी अग्निस्थापना व गणहोम, संगीत कला विद्यालयाचा भावगीतांचा कार्यक्रम, अमित स्वामी यांचा नृत्याचा आणि मनोज मेस्त्र्ााr यांच्या शास्त्र्ााrय संगीताचा कार्यक्रम, विश्वजीत बोरवणकर आणि मंगेश बोरगावकर यांची संगीत रजनी पार पडणार आहे. 27 जानेवारी रोजी पंचायतन याग, भाव सुगंध मंडळाचे भजन, दीप्ती हळदणकर यांची नृत्यांजली, पंडित रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन, पंडित नीलाद्री कुमार यांचे गिटार वादन होणार आहे.
  • 28 जानेवारी रोजी श्री ब्रह्मणस्पती सुक्त, श्री सुक्त, अथर्वशीर्ष, हवन आणि श्रींस पूर्णाहुति, अश्विनी भिडे यांचे विठ्ठल-रखुमाई भजन, सामूहिक नामस्मरण, मीनाक्षी कामत यांचे शास्त्र्ााrय कथ्थक, स्वप्नील चव्हाण यांचे स्वर ब्रह्मांड भक्तिगीत, पद्मश्री विजय घाटे आणि अभिजित पोहणकर यांचा वादन आणि गायनाचा कार्यक्रम, पंडित रवी चारी यांचे सतारवादन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.