एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pradip sharma mumbai police encounter cop

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याचं वृत्त आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख मिळवणाऱ्या शर्मा यांच्या घरी ही धाड पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी असून ते वर्षभरापासून अधिक काळ कारागृहात होते. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी आयकर विभागाने शर्मा यांच्या अंधेरी आणि अन्य एका घरी धाड टाकली आहे.