प्रकाश आंबेडकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

या भेटीबाबत प्रसारमाध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले, ”शरद पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीत महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. देशात लवकरच पाच राज्यांत निवडणूक होणार आहेत. तोपर्यंत काही घडेल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.