राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यात 191 कोटींचा घोटाळा, विखे पितापुत्रांसह 28 जणांविरोधात तक्रार दाखल

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पा. सहकारी साखर कारखान्याने 191 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. 2 एप्रिल रोजी लोणी पोलीस ठाण्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या सहसंचालक मंडळाच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत, जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असा आरोप प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे.

प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीचे अरुण कडू पाटील, बाळासाहेब केरुनाथ विखे व एकनाथ घोगरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना अरुण कडू व बाळासाहेब विखे यांनी सांगितले, विद्युलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. या कारखान्याने 19 कोटींचा मोठा घोटाळा केलेला आहे. कागदपत्रांच्या हेराफेनीने आहातातील रक्कमांच्या अदलाबदलीने, त्याचप्रमाणे वार्षिक अहवाल व ताळेबंदातून सभासद ऊत्त उत्पादकांची घोर फसवणूक करून भा. दंड विधाम 420 व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे घडलेले आहेत. या संदर्भात बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे आजही 4 एप्रिल 2024 रोजी याच फिर्यादी संदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक राकेश ओला, नगर यांची भेट आम्ही प्रवरा शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह घेतली आहे व फिर्यादीची प्रत त्यांना दिलेली आहे, असंही विखे यावेळी म्हणाले.

‘जानेवारी 2023 पासून आम्ही या संदर्भात शासन दरबारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी करून त्या तक्रारीच्या संदर्भात पाठपुरवा करीत आहोत. जानेवारी 2023 मध्ये साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांनी आमची तक्रार नगर येथील साखर सहसंचालकांकडे पाठविली. या महोदयांनी सातत्याने कारखान्याकडे खुलासा मागितला. परंतु त्यांनी अधिकाराचा विशेष वापर करून काही कारवाई करणे आवश्यक होते, तसे काही न करता ते फक्त खुलासा मागत राहिले. इतकेच नव्हे तर कारखान्याचा कुठलाही खुलासा प्राप्त झाला नाही. म्हणून त्यांनी तृत्तीय लेखापरीक्षक वर्ग 1 (साखर), यानाही कारखान्याच्या या हेराफेरी संदर्भात चौकशी करण्यास सांगितले. मात्र संबंधित लेखापरीक्षक महोदय यांनी ही कारखान्याकडे लेखी देऊन फक्त खुलासा मागितला. यापलिकडे काहीही कारवाई झाली नाही कारखान्यानेही कुठली माहिती त्यांना दिलेली नाही’ असे कडू व विखे म्हणाले.

‘या संपूर्ण पार्श्वभूमीवर आम्ही आता रीतसर फिर्याद लोणी पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2024 रोजी दाखल केली आहे. व आम्ही त्या खात्याकडे विनंती केलेली आहे की, आपण गुन्हा नोंदवून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हा सभासदांच्या व ऊस उत्पादकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. आमची ही तक्रार लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेली आहे, असा कदाचित गैरसमज होण्याचा संभव आहे. पंरतु या आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही जानेवारी 2023 पासून या सर्व घोटाळा व आर्थिक अफरातफरी प्रकरणी पाठपुरावा करीत आहोत. परंतु या संदर्भात आमच्या तक्रारीची संबंधित खात्याच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने दखलच घेतली नाही. इतके गंभीर प्रकरण असतांना सुध्दा दखल घेत नाहीत, म्हणूनच नाईलाजास्तव आम्हाला पोलिसांकडे जाणे भाग पडले. त्यामुळे निवडणूक वगैरेशी या तक्रारीचा काहीएक संबंध नाही. ही पूर्णपणे आर्थिक भ्रष्टाचार, कागदपत्रांची हेराफेरी करून आकडेवारीत फेरफार करून आम्हा ऊस उत्पादक सभासदांच्या नजरेत धूळफेक आलेली आहे. त्याचप्रमाणे ही खोटी आकडेवारी दाखवून अनेक बँकाची गेले अनेक वर्ष फसवणूक करून बेकायदेशीर कर्ज घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी या व्याजाचा भुर्दंड सभासदाच्या माथी मारला जातो. ऊसाचा दरही कमी दिला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

‘प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या पिता पुत्रांनी घोटाळा केलेला आहे. आम्ही वर्षभरापासून ही बाब उघड आणलेली आहे, मात्र आम्हाला कोणीही मदत केलेली नाही, त्यामुळे आम्ही आता रीतसर याची तक्रार दाखल केलेली आहे. जर आमच्या तक्रारीची दखल पोलीस विभागाने घेतली नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर केव्हाही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व बाबीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे यांना जवळपास सर्व संस्थेतून बाजूला करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे आता सुजय विखे यांना उठायला बसायला कुठलेही ठिकाण आता राहिलेले नाही. मुळा प्रवरा संस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कटकारस्थान केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार हा राहुरी सहकारी साखर कारखान्यामध्ये केला असल्याचेही अरुण कडू म्हणाले.

‘गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे कट कारस्थान केल्यामुळे आम्ही सर्व विरोधकांनी एकत्रितपणे येऊन त्यांच्या विरोधामध्ये प्रचार केला व त्यांचा हजारोंच्या मताने पराभव केला असल्याचेही विखे व घोगरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता प्रवरा सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तर दुसरीकडे ज्या प्रवराच्या ठिकाणी इतर काही महत्त्वाच्या अशा संस्था होत्या त्या व्यवस्थितरित्या चालत नाहीत म्हणून त्या बीओटी तत्त्वावर त्यांनी दिल्या आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही जे काय आरोप केलेले आहेत ते आम्ही अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, त्या आधारे केलेले आहेत, असं ते यावेळी म्हणाले.

उमेदवार सुजय विखे विरोधात सुद्धा खटला सुरू

भाजपाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयामध्ये एका खटल्याच्या संदर्भामध्ये म्हणजेच कोरोना काळामध्ये जे रिमडेशिवर आणले गेले, त्यामध्ये सुद्धा त्यांनी घोटाळा केलेला आहे. त्यामुळे ती सुद्धा केस न्यायालयामध्ये सुरू असल्याचे अरुण कडू यांनी सांगितले. तर दुसरा खटला हा साडेनऊ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा असून त्याची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असल्याचेही ते म्हणाले.

आरोपींनी दिनांक 31 मार्च 2022 अखेरच्या ताळेबंद व नफातोटा पत्रक व त्या अनुषंगाने असलेल्या 73 वा वार्षिक अहवालात, सन 2021-22 आरंभी रकमा ताळेबंदाच्या न नमुन्यात वर नमूद केल्याप्रमाणे तफावत केली. खोट्या रक्कमा नमूद करून बनावट अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रके, कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केला. आरोपींनी एकमिलाफी होऊन कट रचून संगनमताने व अनाधिकाराने सदर रक्कमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी स्वतःचा गैरकायदा फायदा करून, फिर्यादी, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, व्यापारी, वित्तीय संस्था व शासनाची फसवणूक करून गैरकायदा तोटा केलेला आहे. अशा रीतीने 170 कोटी रुपयांचा तोटा असताना त्या ऐवजी पुढील सन 2021-22 अहवालातील ताळेबंदात 21 कोटी रुपयांचा नफा दाखविण्यात आला. त्यामुळे 191 कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा आरोप करण्यात येत आले.

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.
राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (लोणी बु. ता. राहाता)
विश्वासराव केशवराव कडू पाटील (सात्रळ ता. राहुरी)
कैलास सूर्यभान तांबे पाटील (चिंचपूर ता. संगमनेर)
सतीश शिवाजीराव ससाणे पाटील (ममदापूर ता. राहाता)
दिनकर गणपत गायकवाड पाटील (आश्वी खुर्द ता. संगमनेर)
भानुदास लहानु तांबे पाटील (दाढ)
देवीचंद भारत तांबे पाटील (मयत)
संजय सोपानराव आहेर पाटील, (लोणी खुर्द)
दादासाहेब चंद्रभान घोगरे पाटील (लोणी खुर्द)
धनंजय बाबासाहेब दळे पाटील (भगवतीपुर ता. राहाता)
स्वप्निल सुरेश निबे पाटील (कोल्हार)
दत्तात्रय साहेबराव खर्डे पाटील (कोल्हार ता. राहाता)
साहेबराव जिजाबा म्हस्के पाटील (बाबळेश्वर ता. राहाता)
संपत भाऊराव चितळकर मांडवे पाटील (ता. राहाता)
रामभाऊ शंकरराव भुसाळ पाटील (उंबरी ता. संगमनेर)
बाबू फकीरा पडघलमल पाटील, (मयत)
शांताराम गेणू जोरी पाटील (दाढ खुर्द ता. संगमनेर)
सुभाष नामदेव अंत्रे पाटील (सोनगाव ता. राहुरी)
उज्वला अशोक घोलप पाटील (हनुमंतगाव ता. राहाता)
संगीता भास्कर खर्डे पाटील (भगवतीपुर ता. राहाता)
सुजय राधाकृष्ण विखे पाटील (लोणी बु ता. राहाता)
अण्णासाहेब मुरलीधर म्हस्के पाटील (शिबलापुर ता. संगमनेर)
पोपटराव आनंदराव वाणी पाटील (झरेकाठी ता. संगमनेर)
दिलीप गोरक्षनाथ कडू पाटील (तिसगाव ता. राहाता)
ए. के. भागडे (प्र. कार्यकारी संचालक, प्रवरानगर)
अमोल तानाजी पाटील (कार्यकारी संचालक, प्रवरानगर),
कुलकर्णी अँड खानोलकर – सनदी लेखापाल तर्फे व करिता भागीदार पी.एम. परुळेकर
टी.आर. ढोणे (कार्यकारी संचालक, प्रवरानगर (मयत)