प्रत्यार्पणासाठी नीरव मोदीची आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

पंजाब नॅशनल बँकेचा दोन अब्ज रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीची सुनावणी लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात  गुरुवारी होणार आहे.

हिंदुस्थानातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वेडस्वर्थ कारागृहात बंद आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याआधी त्याच्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. आता त्याने तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे.