
अलिकडे लग्न ठरल्यानंतर प्री वेडिंग शूटचा ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे फोटोशूट करण्यासाठी कोण कुठे जाऊन काय फोटोशूट करेल याचा काही नेम नाही. असंच एक प्रकरण ग्वालियर येथे समोर आले आहे. एक जोडपं जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅकवर प्री वेडिंग शूट करत होते. दरम्यान त्यांना ट्राफीक डीएसपीने पाहिले आणि नंतर त्यांची अशी अवस्था झाली.
दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर एक जोडपं प्री वेडिंग फोटोशूट करण्यासाठी आले होते. ते रेल्वे ट्रॅकवरच फोटोशूट करत होते. त्यांच्यासोबत प्री-वेडिंग शूट करणारे कॅमेरामन आपला जीव धोक्यात घालून फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते. रेल्वेच्या पटरीवर झोपून जेव्हा हे फोटोशूट सुरु होते. याच दरम्यान ट्राफीक पोलीस अधिकारी डीएसपी नरेश कुमार त्रिपाठीया तिथून जात होते. जेव्हा त्यांनी पाहिले की रेल्वे ट्रॅकवर तरुण आणि तरुणी बरीच मुलं दिसत आहेत. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्यांच्याजवळ गेले.
त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता कपल त्यांच्या लग्नासाठी प्री वेडिंग फोटोशूट करत होते. त्यानंतर ट्राफीक डीएसपी यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि तिथून पळवून लावले. त्यांनी सांगितले की, इथे दर 5 मिनीटानंतर सुपर फास्ट ट्रेन येते आणि यात एका चुकीमुळे जीव जावू शकतो.


























































