स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच 28 मे रोजी होणार आहे. याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली आहे.

नवीन संसद भवनाचं काम पूर्ण झालं असून या नवीन भवनाची इमारत हिंदुस्थानच्या स्वयंपूर्णतेचं प्रतीक आहे, असंही लोकसभा अध्यक्ष म्हणाले. संसदेच्या जुन्या गोलाकार इमारतीसमोरच नव्या संसदेची त्रिकोणी आकारातील इमारत आहे. नव्या इमारतीमध्ये सेट्रंल हॉलची क्षमता एक हजार लोक बसतील, अशी करण्यात आली आहे. नवीन इमारतीचा विस्तार 65 हजार चौरसफूट इतका आहे.

जानेवारी 2021मध्ये या इमारतीचं काम सुरू झालं. टाटा प्रोजेक्ट्स या इमारतीची निर्मिती करत आहे. या प्रकल्पासाठी 862 कोटींची रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र, या इमारतीचा एकूण खर्च सुमारे 1200 कोटी इतका झाला आहे. त्याखेरीज या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून अजून खर्च करण्यात येणार आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांखेरीज या भवनात एक वाचनालय, बैठकांच्या खोल्या, कार्यालय, एक हॉल असे भाग असणार आहेत. संसदेची सध्याची इमारत ही जवळपास 96 वर्षं जुनी असून तिचं काम 1927 मध्ये पूर्ण झालं होतं.