
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी एलिमिनेटर सामने खेळले गेले. पहिला सामना गतविजेत्या दबंग दिल्ली आणि बंगळुरू बुल्समध्ये खेळला गेला. एकतर्फी झालेला हा सामना जिंकत बंगळुरू बुल्स उपांत्य फेरी गाठली. तर दुसरा एलिमिनेटर सामना तमिळ थलायवाज आणि यूपी योद्धाजमध्ये झाला. निर्धारित वेळेत सामना 36-36 असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरमध्ये निकाल लावण्यात आला. यात तमिळ थलायवाजने बाजी मारत दिल्लीला घरचा रस्ता दाखवला.
मुंबईतील एनएससीआयएसव्हीपी स्टेडियमध्ये रंगलेल्या पहिल्या एलिमिनेटर सामना बंगळुरू बुल्सचा रेडर भरत हुडा याने दमदार परफॉर्मन्स दाखवला. त्याने संपूर्ण लढतीत 15 पॉइंट घेतले, तर विकास कंडोला याने 13 पॉइंट घेत त्याला चागंली साथ दिली. बंगळुरुने सामन्याच्या सुरुवातीपासून दिल्लीवर दबाव टाकला आणि चौथ्याच मिनिटात त्यांना ऑन आऊट केले. यानंतर दिल्लीचा संघ शेवटपर्यंत सावरूच शकला नाही. नवीन
पहिल्या हाफच्या अखेरीस बेंगलोर संघाकडे 17 गुणांची आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये देखील त्यांनी ही आघाडी उत्तरोत्तर वाढवत 56-24 असा दणदणीत विजय मिळवला.
रेकॉर्डब्रेकर प्रदिपचा यूपी संघ बाहेर
चार वर्षात प्रथमच एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या तमिल थलायवाजने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण ठेवत त्यांनी सातत्याने यूपी संघावर आघाडी मिळवली. नरेंदर गेहलोत व अजिंक्य पवार यांनी रेडिंग तर मोहित व साहिल यांनी डिफेन्समध्ये दम दाखवला. त्यामुळे रेकॉर्डब्रेकर प्रदिप नरवालच्या संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने
गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पहिला सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगलोर बुल्स असा होईल. तर, दुसरा उपांत्य सामना पुणेरी पलटण विरुद्ध तमिल थलायवाज असा रंगेल. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (17 डिसेंबर) खेळला जाईल.

























































