कॅनडातील ब्रॅम्प्टन प्रांतात उभारण्यात आलेल्या महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळय़ावर काही पॅलेस्टिनी हल्लेखोरांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्यावर पॅलेस्टाईनचा झेंडाही लावला. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
कॅनडाच्या एका पत्रकाराने याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 37 सेपंदांचा आहे. यात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळय़ावर चढलेले दोन तरुण त्यांच्या घोडय़ावर पॅलेस्टाईनचा झेंडा लावताना दिसत आहेत.