शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मनमानीविरोधात शिक्षकांचा मोर्चा

173

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मनमानी व नियमबाह्य कारभाराविरोधात बुधवारी वाशी येथील एसएससी बोर्डाच्या कार्यालयावर अकरावी-बारावीच्या शेकडो शिक्षकांनी मोर्चा काढला. एसएससी बोर्डाच्या मुंबई विभागीय अध्यक्षांना निवेदन देऊन या कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यातील सुमारे 800 शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या वतीने मुंबई विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिक्षकांना शालार्थ आयडी क्रमांक विनाविलंब देण्यात यावेत, संचमान्यता नियमानुसारच करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे प्रा. मुकुंद अंधळकर, प्रा. अमर सिंह, प्रा. प्रकाश दीक्षित, प्रा. सुनील पूर्णपात्रे, प्रा. दत्तात्रय चितळे, प्रा. सुरेश अहिरे, प्रा. जगदीश पाटील, प्रा. विलास खोपकर, प्रा. भरत दळवी आदी सहभागी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या