मॅच फिक्सिंगने महाराष्ट्र अस्वस्थ, लोकांत संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेली शिवसेना गद्दार आणि चोरांच्या हाती गेल्याने उभा महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. मिंधे आणि भाजपच्या या मॅच फिक्सिंगविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आणि चीड निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारून फुटीर मिंध्यांच्या बाजूने एकतर्फी निकाल देणाऱया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. निकालाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनता आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून ऐतिहासिक बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. काळे झेंडे दाखवून नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उतरले. हातकणंगले, नगर, श्रीरामपूर, राहुरी, कर्जतमध्येही आंदोलन करण्यात आले.

नागपूरच्या रेशीमबाग चौकातील शिवसेना कार्यालयासमोर राहुल नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून संतप्त शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. ‘50 खोके राहुल नार्वेकर ओके’ अशा घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. गद्दार मिंधे सरकारला येत्या निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा किशोर कुमेरिया यांनी दिला. या आंदोलनात राजेश कनोजिया, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, किशोर ठाकरे, महेंद्र कठाणे, शंकर बेलखोडे, मनोज शाहू , शारदा मेश्राम, मंगला राणे, सुखदेव डोके यांच्यासह अनेक शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

कुर्ला-कलिना विधानसभेत जोरदार निषेध

शिवसेना विभाग क्र. 6 कुर्ला-कलिना विधानसभेच्या वतीने विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. विभाग संघटक अश्विनी मते, हर्षदा परब, कुर्ला विधानसभा संघटक दिलीप शिंदे, उपविभागप्रमुख राजू परब, बळीराम घाग, संदीप गावडे, उपविभाग संघटक साधना डाळ, माजी नगरसेवक सगुण नाईक, दिनेश कुबल, माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर, प्रविणा मोरजकर, बाळा नाईक यांच्यासह विभागातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

भायखळय़ात काळे झेंडे दाखवले

शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने पॅलेस चित्रपटगृहाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर, भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, चंदना साळुंखे, उपविभाग संघटक किर्ती शिंदे, सहसंघटक हेमंत कदम, सूर्यकांत पाटील, सहसंघटक शिल्पा जाधव, शाखाप्रमुख काका चव्हाण, रमेश रावल, सुहास भोसले, प्रियंका टेमकर, अंजना औटी, संध्या तळेकर, स्वप्नील बागवे, रमेश चेंदवणकर, विकास झगडे, युवासेना मुंबई समन्वयक सिद्धेश मंडलिक, चेतन थोरात, अमित जाधव, युवासेनेचे विभाग अधिकारी ओंकार पाटील, विभा मोरे, योगेश झावरे, ज्ञानप्रकाश तिवारी, राज चव्हाण, अमित परब, सागर जाधव, राहुल रहाटे, ऐश्वर्य साटम, अपूर्व मयेकर, ऋतिक नाईक, दुर्वेश पवार, मनीषा जांभरे, शिल्पा म्हात्रे, मधुकर कांबळे, भाई मुरुडकर, अजित बाठे, आशा वसंत चव्हाण, राजेश जामसुतकर उपस्थित होते.

घाटकोपरमध्ये जोरदार घोषणाबाजी

ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 चे विभागप्रमुख तुकाराम पाटील, विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पूर्व येथे विधानसभा अध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी घाटकोपर पूर्व आणि पश्चिम तसेच मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेतील शिवसेना, युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विलेपार्ल्यात हुकूमशाही सरकारची अंत्ययात्रा

सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा खून करणाऱया हुकूमशाही सरकारची गुरुवारी विलेपार्ले स्टेशन येथे अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विभागप्रमुख – आमदार ऍड. अनिल परब आणि शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लोकशाहीचा गळा घोटणाऱया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसैनिकांकडून जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत, विधानसभा संघटक रुपाली शिंदे, समन्वयक नितीन डिचोलकर, मंगला शेलार, जुईली शेंडे, उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार , समीर साबे, शुभदा पाटकर, जितेंद्र जानावळे, शाखा प्रमुख अनिल मालप, प्रकाश सकपाळ, शाखा संघटक अस्मिता सावंत, स्नेहल महाडिक, अपर्णा उतेकर, युवासेना मुंबई समन्वयक पोपट बेदरकर, श्रद्धा कदम, विभाग अधिकारी सिद्धेश पवार, हर्षाली बेलवलकर, समन्वयक विश्वास पाटेकर, सोशल मिडिया समन्वयक वैभव सावंत, चिटणीस जय मिश्रा, आनंद पाठक, उपविभाग अधिकारी समीर राणे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ मालपेकर, सूर्यकांत नलावडे, बाबू लाड, रितेश रेडकर, मुकेश पाटील, प्रभाकर चौरे यांनी प्रयत्न केले.

नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा

आमदार अपात्रतेच्या निकालाने कुणालाही धक्का बसला नाही. निकाल काय लागणार हे सर्वांना माहीत होते. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. नार्वेकर यांनी दिलेला निकाल हे सगळे सुरुवातीपासून रचलेले षड्यंत्र होते. त्यांची नार्को टेस्ट केल्यास सत्ताधाऱयांचे सर्व षड्यंत्र बाहेर येईल. या निकालासाठी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशच बनवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

नाटकाची स्क्रिप्ट तयार होती

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्यांना विधानसभा अध्यक्षांनी ‘शिवसेना पक्ष’ म्हणून मान्यता दिली. या निर्णयावर राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी टीकास्त्र्ा सोडले. या नाटकाची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती, असे ते म्हणाले. ‘स्पीकरने (ट्रिब्युनल म्हणून) शिंदे गटाला शिवसेना म्हटलं आहे. नाटकाची स्क्रिप्ट फार आधीपासून तयार झाली होती. आम्ही विनापरवाना चाललेला फार्स पाहतो आहोत. हीच या ‘लोकशाहीच्या माते’ची शोकांतिका आहे,’ अशी पोस्ट ‘एक्स’वरून करत सिब्बल यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका केली.

50 खोके, नार्वेकर ओके!

नागपुरात रेशीमबाग चौकात राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत ‘50 खोके, राहुल नार्वेकर ओके’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. नागपूरच्या राणी दुर्गविती चौकात युवासेनेने तीव्र निदर्शने करत राहुल नार्वेकर यांचा पुतळा जाळला. युवासेना नागपूर जिल्हाध्यक्ष शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

– मुंबईत भायखळा, घाटकोपर, कुर्ला येथे हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. निषेधाचे फलक झळकावत शिवसैनिकांनी घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.
– वर्ध्यातील पुलगावमध्ये संतप्त जमावाने एसटी बसवर दगडफेक केली. पुलगाव रेल्वे स्टेशन परिसरात शेकडो शिवसैनिकांनी संतप्त निदर्शने केली. विधानसभा प्रभारी आशीष पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

काँग्रेसचा निषेधाचा ठराव

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधाचा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेवरील निकाल हा लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने देशातील सर्वच राज्यांत राजकीय अस्थिरता माजेल, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा ठराव बैठकीत मांडला.