
दंतशास्त्र हा अत्यंत किचकट वाटणारा विषय सोप्या पद्धतीने सोडवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य डॉ. उदय ताम्हणकर गेल्या चार दशकांपासून करत आहेत. त्यासाठी ते अत्याधुनिक उपचार पद्धती अवलंबत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दंतशास्त्रातील नवनवीन उपचार पद्धती व त्याचे आपल्या जीवनशैलीने होणारे फायदे याची माहिती सोप्या भाषेत ‘आधुनिक दंतशास्त्र व बरंचसं बेसिक’ या पुस्तकात डॉ. ताम्हणकर यांनी मांडली. त्याचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते झाले.
मुंबईतील अग्रगण्य दंतशास्त्र चिकित्सक व सिरॅम्को डेंटल क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. उदय ताम्हणकर चार दशकांपासून दंतशास्त्र क्षेत्रात बोरिवली पश्चिम येथे मोठय़ा सचोटीने काम करत आहेत. दंतशास्त्र हा अतिशय किचकट वाटणारा विषय सोप्या पद्धतीने सोडवून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्याकडे असणाऱया अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे ट्रीटमेंट कमी वेळात आणि कमी खर्चात होते. डॉ. ताम्हणकरांवरील रुग्णांचा विश्वास व दवाखान्यातील त्यांचे सहकारी डॉक्टर्स, कर्मचारी वर्गाच्या नम्र वर्तणुकीमुळेच आज देशातील सर्वात मोठे दंतवैद्यक शास्त्राचे आधुनिक दालन अशी सिरॅम्को डेंटल क्लिनिकची ख्याती झाली असल्याचे गौरवोदगार मान्यवारांनी पुस्तक प्रकाशना वेळी काढले. यावेळी शिवसेना आमदार विलास पोतनीस, मुंबईचे माजी उपमहापौर मोहन मिठबावकर, डॉ. वसंत खटाव, डॉ. वि. वा. केळकर, डॉ. राजेश घागरे, डॉ. सुधीर पाध्ये, डॉ. व्रजेश शहा, डॉ. राहुल गडकरी, डॉ. परेश नवलकर, डॉ. चेतन पाटील, डॉ. हेमंत ईनामदार आदी उपस्थित होते.
पुस्तक घरपोच हवे असल्यास डॉ. उदय ताम्हनकर, बोरिवली (पश्चिम) यांना 9820036699 या क्रमांकावर संपर्क साधावा.




























































