पुणेकरांना पाणीकपातीची झळ बसणार, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान विभागाने आज यंदा मान्सून उशिरानं दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जूनमध्येही यंदा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर तसेच सध्या धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने पुणे महानगर पालिकेने शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे.

पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. ”येत्या गुरुवार म्हणजेच 18 मे पासून प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे” असे या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणी कपातीची झळ बसणार आहे.