हौस आली अंगलट, सीसीटीव्हीमुळे पकडला चोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागड्या दुचाकीवर फिरण्याचा शौक पुर्ण करण्यासाठी पठ्ठयाने संबंधित दुचाकी चोरली. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून महागडी दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

संदीप संपत आंधळे (वय 23 रा. घुलेनगर, मांजरी बुद्रूक मूळ रा. लिंबोरी, ता आष्टी, जि. बीड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीस्वार चोरटा संदीप आंधळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ताब्यातील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, चेतन गोरे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली.

फक्त महागड्या गाडीवर फिरण्याची होती हौस

महागड्या दुचाकीवर फिरण्यासाठी आरोपी संदीपने दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाने पेट्रोलिंगदरम्यान आरोपीला अटक केली. त्याच्याकडून महागडी दुचाकी जप्त केली आहे.