Pune crime news लोणी काळभोर, खडक परिसरातील जुगार अड्ड्यावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील लोणी काळभोर आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशेवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई करून जुगाराचे साहित्य, रोकड असा तब्बल 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, 18 जणांवर कारवाई केली.

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत पिंपळाचा मळा येथील राईंज वस्ती तर, खडक हद्दीत भवानी पेठेतील काशेवाडी येथे कारवाई करण्यात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान लोणी काळभोर भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रतक्षा कारवाई केली असता ९ जण रम्मी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तर, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काशेवाडी येथे जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने येथे छापा टाकला. त्यावेळी येथे 9 जण जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड असा 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार राजेंद्र कुमावत, संदीप कोळगे, इम्रान नदाफ, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.