
शिवाजीनगर परिसरात एकाला मारहाणीत जखमी करीत तब्बल 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केले. संतोष मुंकूद नाईके (वय 41, रा. शिवाजीनगर, गावठाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फरासखाना तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातंर्गत एका गुन्ह्यात फरार झालेला आरोपी संतोष नाईके हा पोलीस अमंदार रिजवान जिनेडी आणि तुषार खडके यांना दिसून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेउन शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, महमंद हनीफ, शौकत शेख, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली.






























































