
जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना 7 जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास ताडीवाला रस्ता परिसरातील दत्त मंदीरानजीक गल्लीत घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या लोकांना खुन्नस का देतो असे म्हणत टोळक्याने तरूणाला दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रोहित गांधले (वय 23) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी परिसरात आरडा-ओरड निर्माण करून दहशत निर्माण केली होती. पोलीस उपनिरीक्षक ए. के. गोरे तपास करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीनुसार फिर्यादी गणेश कांबळे वय 25 हे मित्रासह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आलेल्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या वादातून गणेशला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. त्याशिवाय गणेशचा मित्र संदीप चव्हाण याला शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.
































































