पुणे- नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील वर्पे मळा परिसरात पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर या वन्य प्राण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले आहे. कळंब येथील वर्पेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर हा वन्यप्राणी गंभीर जखमी झाला होता.

ही माहिती स्वप्निल भालेराव यांनी वनपाल शशिकांत मडके यांना दिली तात्काळ वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू सदस्य घटनास्थळी हजर होऊन जखमी सांबर या वन्य प्राण्याला उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्युमुखी पडले. दरम्यान कळंब वन विभाग परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दर्शन होत असते त्याचबरोबर अनेक पाळीव जनावरांवर हल्ले देखील बिबट्याने केलेले आहेत मात्र सांबर हे वन्यप्राणी या परिसरात पहिल्यांदाच आढळून आले होते, या सांबराच्या मृत्यूने या परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून त्याचा दफनविधी करण्यात आला आहे.