भाजपची नगरसेविका अडचणीत,कोणत्याही क्षणी अटक होणार

सामना ऑनलाईन, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पालांडे यांच्यावर एका व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळल्याने पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

पिंपरी शहरातील संत तुकारामनगरमधील एका टपरीधारकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या व्यवसायिकाच्या ‘सुसाईड नोट’मध्ये सुजाता पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होतं.यामुळे पालांडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पालांडे फरार झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या