पुण्यात खासगी हेलिकॉप्टर कोसळलं, चार प्रवासी जखमी

पुण्यात एक खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते आणि चारही जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठीलीह जीवितहानी झालेली नाही.

पुण्याहून हैद्राबादसाठी ग्लोबल हेक्ट्रा या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर निघाले होते. या हेलिकॉप्टरमधून आनंद कॅप्टन, दिर भाटिया, अमरदीप सिंग आणि एस पी राम हे प्रवास करत होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर चौघेही जखमी झाले आहेत. त्यात कॅप्टन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे.