
पुण्यातील शनिवार पेठेतील नूतन मराठी विद्यालयात पालखी आणि वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर आयोजित करण्यात आलेला हा सोहळा खास असणार आहे. यावेळी 1300 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात विठू नामाचा गजर करत सोहळ्यात सहभाग घेतला होता.




































































