पुणे – खरेदीसाठी गर्दी वाढली, वाहनांनी रस्ते कोंडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीच्या निमित्ताने शहरातील मध्यवर्ती भागात आज नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनसंख्या वाढल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. विशेषतः बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, मंडई, शिवाजी रस्ता, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

शहरात मागील दोन दिवसांपासून वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खरेदीनिमित्त कुटूंबिय दुचाकी आणि चारचाकी घेउन मध्यवर्ती ठिकाणी येत आहेत. त्यामुळे वाहनसंख्या नेहमीपेक्षा दुपटीने संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहतूक बंदोबस्त असूनही वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.