व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणारा गजाआड

crime

इंस्टाग्रामवर तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱया तरुणाला युनिट 11 ने अटक केली. अक्षय पवार असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

तक्रारदार तरुणी आणि अक्षयने पूर्वी एकत्र शिक्षण घेतले होते. तरुणीने तिच्या मित्रासोबतचे काही फोटो ईमेलवर सेव करून ठेवले होते.अक्षयला काही दिवसांपूर्वी तरुणीचा ईमेल आणि पासवर्ड मिळाला. त्याने ईमेल उघडला असता त्याला तरुणीचे तिच्या मित्रांसोबतचे फोटो दिसले. राग व्यक्त करण्यासाठी अक्षयने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडले. तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. घडल्या प्रकरणी तरुणीने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या