पुण्यात सहा वर्षांपासून फरार सराईताला अटक

crime

स्वारगेट परिसरातून वाईकडे जाणाऱ्या तरुणाला चॉपरचा धाक दाखवून 22 हजारांची रोकड चोरुन सराईताने पळ काढला होता. ही घटना 2014 मध्ये घडली होती. सहा वर्षानंतर सराईताला पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. संदिप उर्फ संज्या भगवान शिंदे (रा.जनता वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

स्वारगेट पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, तरुणाला लुटणारा आणि सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत जनता वसाहतीत येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संदीपला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तरुणाला चॉपरचा धाक दाखवून 22 हजारांची रोकड चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, ज्ञाना बडे, मनोज भोकरे विजय कुंभार, सचिन दळवी,अमित शिंदे, शंकर गायकवाड यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या