पंजाबमध्ये कर्जाच्या बोजाला कंटाळून एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या जालंधर कस्बा आदमपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या बोजाला कंटाळून एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अहमदपुरातील ड्रोली खुर्द येथे राहणारे 55 वर्षीय मनमोहन सिंह यांनी आपली पत्नी सरबजीत कौर, मोठी मुलगी प्रभज्योत कोर उर्फ ज्योति, लहान मुलगी गुरप्रीत कौर उर्फ गोपी आणि प्रभज्योत कौर यांची मुलगी अमन यांनी आत्महत्या केली. आज या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

मनमोहन सिंह हे आदमपूर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर म्हणून काम करत होते. गावातील काही लोकं त्यांना कर्ज घेतल्यामुळे त्रास देत होते. सर्वांच्या गळ्याभोवती गळा आवळल्याच्या खुणा दिसत आहेत. मनमोहन सिंह यांच्या गळ्याभोवती गळफासाची खूण आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रभज्योत कौर उर्फ ​​ज्योतीने आपला पती सरबजीतचा फोन उचलला नाही तेव्हा सरबजीत रविवारी रात्री सासरच्या घरी पोहोचला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही कोणी दरवाजा न उघडल्याने सरबजीतने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तिथे त्याने पाहिले की, त्याचे सासरे मनमोहन सिंग लटकलेल्या अवस्थेत दिसत होते आणि बाकीचे लोक बेशुद्ध पडलेले होते. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. मनमोहन सिंग यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपासून त्यांच्या घरातून कोणीच बाहेर प़डले नव्हते. घराचे दरवाजे आतून बंद होते. मनमोहन यांचा जावई सरबजीत आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

मनमोहन सिंह यांचा मोठा मुलगा चरणप्रीत ऑस्ट्रेलियाला राहतो. चरणप्रीत दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेला होता. मनमोहन सिंग यांच्याकडून पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या करत असून आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार धरु नये असेही लिहीले आहे. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे. सुसाईड नोट ताब्यात घेतली असून पोलिसांनी ती फॉरेन्सिकसाठी पाठवलीआली आहे. . या पाचही जणांचा मृत्यू कसा आणि कोणत्या वेळी झाला हे जाणून घेण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. कर्जाच्या बोजाला कंटाळबून एका कुटंब संपूर्ण उद्धस्त झाले आहे.