
पंजाबमधील लुधियानात आज गॅस गळती झाल्याची मोठी घटना घडली. त्यामुळे 11 जण ठार झाले असून अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या गॅस गळतीमुले मोठी खळबळ उडाली आहे.
लुधियानातील ग्यासपूर परिसरात गॅस गळतीची घटना घडली आहे. एका किराणा दुकानातून विषारी गॅसची गळती झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच एनडीआरफच्या पथक घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. गोयल किराणा असे गॅस गळती झालेल्या दुकानाचे नाव आहे. गॅसची गळती कशामुळे झाली याचा तज्ञ्जांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, गॅस गळतीमुळे डॉ. शंभुनारायण सिंह यांच्या कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडले आहेत.






























































