नदालचे पाऊल पडते पुढे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदाल याने बुधवारी विक्रमी कामगिरी नोंदवली. त्याने टेनिसमध्ये एक हजारावा विजय मिळवला. अशी कामगिरी करणारा तो चौथाच टेनिसपटू ठरलाय. याआधी जिमी का@र्नर्सने (1274), रॉजर फेडरर (1242) व इवान लेंडल (1068) यांनी ही करामत करून दाखवली आहे. 20 वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या रफाएल नदालने फेलिसियानो लोपेझला हरवून एक हजारावा विजय मिळवला हे विशेष. दरम्यान, रफाएल नदालने गुरुवारी जॉर्डन थॉम्पसनला 6-1, 7-6 अशा फरकाने पराभूत करीत पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुढे पाऊल टाकले.