
कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यावरून सध्या देशभरातून सरकारवर टीका होत आहे. या लाठीचार्जवरून सोमवारी संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चेची मागणी केली. मात्र त्यावरून दोन्ही सभागृहातले कामकाज दिवसभरात सहा वेळी तहकूब करण्यात आले.
Met the Hon’ble Lok Sabha Speaker today along with MPs of the Opposition.
Our demand is simple: Parliament must have a detailed discussion on the brutality unleashed on students yesterday and on the government’s complete lack of accountability for the examination crisis.… pic.twitter.com/qc2ptKQUt7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2026
दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावर संसदेत चर्चा व्हावी यासाठी मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासहीत विरोधी पक्षातील खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमवारी दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या अमानुष प्रकारावर संसदेत सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.





























































