
‘नॅशनल हेराल्ड’ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आता 13 जूनला ईडीसमोर चौकशीला जाणार आहेत. राहुल गांधी सध्या परदेशात असल्यामुळे त्यांनी चौकशीसाठी पुढची तारीख द्यावी, अशी विनंती केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. राहुल गांधी यांना 2 जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते तर सोनिया गांधी यांना 8 जूनला बोलावण्यात आले आहे. मात्र सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्याही चौकशीची तारीख बदलली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






















































