मोदींच्या मुखवट्यामागे देश बरबाद करणारी शक्ती, राहुल गांधी यांचा हल्ला

राजाचा आत्मा ईव्हीएम, सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. त्याच्या जोरावरच इतर पक्षातील नेत्यांना धाक दाखवला जात आहे व भाजपात घेतले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भारतीय जनता पक्षाचा केवळ एक मुखवटा आहे. त्या मुखवटय़ामागून एक शक्ती देशाला बरबाद करतेय, असा हल्लाबोल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. जनतेचे मुद्दे मांडणारी मीडिया, सोशल मीडिया आज देशाच्या हातात नसल्याने बेरोजगारी, हिंसाचार, महागाई, शेतकरी आणि जवानांचे मुद्दे मांडले जात नाहीत. जनतेच्या त्या वेदना जाणून घेण्यासाठीच आपल्याला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली आणि या यात्रेत आपण एकटेच नव्हे तर देशातील सर्व विरोधी पक्ष चालले, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

इंडिया आघाडी नरेंद्र मोदी किंवा भाजपाविरुद्ध लढत नाही असे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले. बॉलिवूडच्या कलाकारांना जसा रोल दिला जातो आणि काय बोलायचे हे सांगितले जाते तशी एक शक्ती मोदींना समुद्राखाली जा, सी प्लेनमधून उड्डाण करा असे सांगते, त्या शक्तीविरुद्ध इंडिया लढतेय, असे राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नामोल्लेख न करता राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींची 56 इंचाची छाती वगैरे काही नाही, ती एक खोकली व्यक्ती आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये आहे

राजाचा आत्मा पोपटात असतो तसा नरेंद्र मोदी यांचा आत्मा ईव्हीएममध्ये असल्याचे ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यावेळी म्हणाले होते. त्याचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, राजाचा आत्मा ईव्हीएमबरोबर देशाच्या प्रत्येक यंत्रणेमध्ये आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्समध्ये आहे.

चव्हाणांसारख्या हजारो लोकांना कारवाईची भीती

काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख न करता राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्याबद्दल भाष्य केले. मोदींना चालवणाऱया शक्तीविरुद्ध लढण्याची आपली हिंमत नाही आणि आपल्याला तुरुंगात जायचे नाही, असे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडताना सोनिया गांधी यांच्यासमोर रडत रडत सांगितले होते. काँग्रेस सोडतोय याची आपल्याला लाज वाटतेय असे ते म्हणाले होते, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. अशोक चव्हाणांप्रमाणेच हजारो लोकांना अशा पद्धतीने घाबरवून टाकले गेले आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचाही गळा त्या शक्तीने पकडून त्यांना भाजपमध्ये ओढले, असेही ते म्हणाले.

भारत जोडो न्याय यात्रेमध्ये आपल्याला आपलेल्या अनुभवांचे उदाहरणही राहुल गांधी यांनी यावेळी दिले. यात्रा सुरू असताना एक तरुण धावत माझ्याजवळ आला. सुरक्षा रक्षकांनी त्याला हाकलले तरी त्याने जवळ येऊन माझा हात पकडला आणि रडू लागला. मी तीन वर्षे व्यायाम केला. माझ्या मनात देशभक्ती होती. लडाखमध्ये जाऊन गोठवणाऱया थंडीत देशाच्या शत्रूविरोधात लढू असा विचार मी केला होता. पण आता अग्निवीर लागू करून माझ्या देशाने मला धोका दिला, अशा भावना त्या तरुणाने व्यक्त केल्या, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर देशाने किंवा लष्कराने तुला धोका दिला नाही तर त्या शक्तीने धोका दिला, असे राहुल गांधी यांनी त्याला सांगितले.

आरएसएस धारावीकरांना उद्ध्वस्त करतेय

मणिपूरमध्ये भाजपने यादवी युद्धाचे वातावरण तयार केल्याने तिथून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आणि देशाला नवीन व्हिजन देण्यासाठी धारावीमध्ये यात्रेची सांगता केली, असे राहुल गांधी म्हणाले. धारावी हे कौशल्याचे पॅपिटल आहे, तिथे गुणवत्ता आहे, पण भाजपामागे असलेली शक्ती धारावीकरांचे आयुष्य उद्ध्वस्त करतेय, त्यांना घराबाहेर काढतेय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मेड इन चायनाचा मुकाबला धारावी करू शकते तसेच तरुणांना रोजगार देऊ शकते म्हणून तिला संपवले जातेय, असे ते म्हणाले.

देशातील 70 कोटी लोकांकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा देशातील केवळ 22 लोकांकडे आहे, असे सांगतानाच राहुल गांधी यांनी यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावरही निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारायला वर्षानुवर्षे लागतात, पण एका लग्नासाठी जामनगरचे विमानतळ दहा दिवसांत उघडले गेले, अशी टीका त्यांनी केली. देशातील 50 टक्के लोकसंख्या आजही मागास आणि गरीब असून 90 अधिकारी आज देश चालवत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

पीक विम्याच्या नावाखाली 16 पंपन्यांच्या खात्यामध्ये 33 हजार कोटी रुपये गेले, पण शेतकऱयांनी नुकसानभरपाई मागितली तेव्हा त्यांनी नाकारली, असे सांगत राहुल गांधी यांनी शेतकऱयांनी होत असलेल्या अन्यायावर बोट ठेवले. गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आज आहे पण मीडियात एक मिनिटही दिसत नाही, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या हातातले बाहुले बनलेल्या मीडियाचाही समाचार घेतला. इलेक्टोरल बॉण्ड ही राष्ट्रीय पातळीवरील हप्ताखोरी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक रोखे म्हणजे हप्तेखोरी

गल्लीबोळातले गुंड जसे हप्ते घेतात तशीच निवडणूक रोखे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील हप्तेखोरी असल्याची टीकाही यावेळी राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, चार प्रकारे ही हप्तेखोरी केली जाते. पहिला म्हणजे पंपनीला पंत्राट दिले जाते आणि तिच्याकडून हप्ता सुरू होतो, दुसरा म्हणजे थेट खंडणीवसुलीसाठी ईडीलाच पाठवले जाते आणि घाबरून संबंधित पंपनी खंडणी देते, तिसरा प्रकार आहे शेल म्हणजे बोगस पंपन्यांचा. अशा अनेक पंपन्यांकडून भाजपला निवडणूक रोख्यांमार्फत कोटय़वधी रुपये मिळाले. या पंपन्यांनी त्यांना मिळणाऱया फायद्यापेक्षा कितीतरी पट जास्त रक्कम भाजपला देणगी म्हणून दिली. चौथा प्रकार म्हणजे पैसे द्या आणि सरकारी पंत्राट घ्या, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.