NCP crisis – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सायंकाळी निकालाचे वाचन करणार आहेत.

मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर 31 जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. उद्याच्या निकालात आमदार अपात्र ठरतात की शिवसेनेचा निकाल कॉपीपेस्ट होतो, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

– निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.